breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: मुंबईत घरीच होणार कोरोनाची चाचणी; पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांच्या सुविधा उपलब्ध
मुंबई : ‘कोरोना कोविड 19’ या विषाणूजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर नागरिकांना अधिकाधिक वैद्यकीय सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी महापालिका विविध स्तरावर देखील संवाद व समन्वय नियमितपणे साधत आहे. महापालिकेच्या याच प्रयत्नांमुळे आजपासून मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोना चाचणीसाठी पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांची सेवा उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे नागरिक या प्रयोगशाळांशी संपर्क साधून व तेथील तज्ज्ञांना आपल्या घरी बोलावून चाचणी करवून घेऊ शकणार आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार या खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांना जास्तीत जास्त 4500 रुपये एवढे शुल्क एका चाचणीसाठी आकारता येणार आहे.