मराठमोळा रॅपर श्रेयशचं हिंदी रोमँटिक हिप हॉप सॉंग,पहा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-251.png)
रॅपर, निर्माता, दिग्दर्शक, संगीत अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमातून श्रेयश जाधव आपल्याला आज वर पाहायला मिळाला. श्रेयश नेहमीच आपल्या नव-नवीन हिप हॉप सॉन्गने प्रेक्षकांची मने जिंकत आलाय. मराठी इंडस्ट्रीला श्रेयशने रॅपचा पायंडा घालून दिला. अतिशय वेगवेगळ्या विषयांवर श्रेयसने केलेले मराठी हिप हॉप, रॅप तसेच गाणी आज पर्यंत खूप गाजली आहेत. आता पुन्हा एकदा श्रेयस आपल्या प्रेक्षकांसाठी नविन गाण घेऊन आला आहे तेही हिंदी रोमँटिक हिप हॉप सॉंग… श्रेयश ने आता “छोड दे” उर्फ किंग जे. डी. या हिंदी रोमँटिक हिप हॉप अल्बम सॉन्गने हिंदी इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Capture-27.jpg)
सामाजिक विषय असो किंवा मग इतर काही असो त्याने नेहमीच निरनिराळे विषय अतिशय सुबक रित्या प्रेक्षकांसमोर मांडले आहेत. श्रेयशचा आज पर्यंतचा प्रवास अगदी वाखाडण्याजोगा आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन-बिनलाईन, बस-स्टॉप, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटांचाही तो निर्माता होता. त्यानंतर “मी पण सचिन” या मराठी चित्रपटातून श्रेयश दिग्दर्शक आणि लेखक या नव्या रूपात प्रेक्षकांच्या समोर आला. मराठी इंडस्ट्री मधून सुरुवात केलेल्या श्रेयश ने आता “छोड दे” उर्फ किंग जे. डी. या हिंदी रोमँटिक हिप हॉप अल्बम सॉन्गने हिंदी इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले आहे.
“छोड दे” हे हिंदी हिप हॉप सॉन्ग दि किंग जे. डी आणि गणराज प्रोडकशन्स निर्मित असून बाली हे या हिप हॉप चे गीतकार आहेत तसेच श्रेयश जाधव उर्फ किंग जे. डी. हे गायक आहेत. दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार याने केले असून एखादी प्रेम कहाणी प्रस्तावा नंतर अगदी तिच्यासोबतच्या अनोख्या पद्धतीने केलेल्या लग्नापर्यंत कशी पूर्णत्वास जाते या आशयाला अनुसरून हे सॉन्ग आहे.