#CoronaVirus: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-230.png)
काही दिवसांपूर्वीच भारतात प्रवेश केलेल्या करोना विषाणूनं देशातील सर्वच राज्यात आपला विळखा घट्ट केला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असून आतापर्यंत ३९ बाधित रुग्ण सापडले आहेत.याच पार्श्वभुमिवर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे नवी मुंबई महापालिकेसह कुळगाव-बदलापूर तसेच अंबरनाथ नगर परिषद निवडणुकांची तारीख लांबणीवर पडणार आहे.
करोना नियंत्रणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी प्रतिबंधात्मक नवे निर्णय जाहीर केले. ‘राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. यासंदर्भात आयोग लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Jagan_Coronavirus_750.jpg)
तसेच निवडणुकांसोबतच शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागांतील शाळा-कॉलेजेही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्याबाबतची घोषणा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे…