Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी रुग्णालयातून पळालेला कोरोना बाधित पुन्हा उपचारास दाखल

रुग्णालयास पोलिसांचा पहारा, संबंधिताला घरातून रात्री तीन वाजता उचलून आणले

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्णाची संख्या 9 झाली आहे. त्या सर्वांवर महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतू, कोरोना बाधित रुग्णाने रुग्णालयातून पलायन केले होते. त्यामुळे वैद्यकीय प्रशासनाची प्रचंड धावपळ सुरु झाली. त्या रुग्णाचा पत्ता शोधून त्याला रात्री तीन वाजता पोलिसांच्या बंदोबस्तात पुन्हा उपचारासाठी दाखल केले आहे.

महापालिकेच्या भोसरी येथील नवीन रुग्णालयातून कोरोना बाधित रुग्णासाठी विलगीकरण कक्ष सुरु केले आहेत. त्या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण उपचारास दाखल आहेत. तसेच काही संशयित देखील दाखल केलेले आहेत. मात्र, शुक्रवारी रात्री एका कोरोना बाधित रुग्णाने रुग्णालयातून पलायन केले होते. या घटनेमुळे वैद्यकीय विभागाची एकच धावपळ सुरु झाली होती.

या कोरोना बाधित रुग्णाचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला पुन्हा रुग्णलयात दाखल केले आहे. प्रशासनाकडे संबंधित व्यक्तीचा पत्ता असल्याने त्याच्या पत्त्यावर जाऊन पोलिसांच्या मदतीने वैद्यकीय विभागाने पलायन केलेल्या रुग्णाला परत आणले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या पाल्याणाच्या घटना घडल्यानंतर प्रशासनाने भोसरी रुग्णालयाभोवती पोलिसांचा पहारा ठेवला आहे.

दरम्यान अहमदनगर आणि नागपूर मधील कोरोना बाधितांनी पलायन केल्याच्या घटना घडल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चार पोलीस कर्मचारी आणि एक अधिकारी रूग्णालय परिसरात पहारा देणार आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून नागरिकांना रुग्णालय परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button