breaking-news
#CoronaVirus: सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई
नागपूर | महाईन्यूज
सावधान, कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरविल्यास कारवाई होऊ शकते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात सायबर सेलला कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाबाबत प्रशासनातर्फे सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. परंतु मागील काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर चुकीची माहिती परवली जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे.
गुरुवारी पॉझिटिव्ह रुग्णाच्या मुलीलाही कोरोना झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. जिल्हाधिकारी ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत सायबर सेलकडे तक्रार केली असून अफवा पसरवणाऱ्यांवर नजर ठेवून कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच नागरिकांनीही जास्त पॅनिक होऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. शाळांना सध्या तरी सुटी देण्याची आवश्यकता नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.