पारनेर,भाळवणी, अळकुटी, सुपा, निघोजचे आठवडे बाजार बंद, कोरोना बाबत पारनेर तालुक्यात खबरदारी उपाययोजना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/8-7.jpg)
पारनेर | महाईन्यूज
कोरोना आजाराच्या साथ सगळीकडे पसरू नये म्हणून पारनेर, सुपा, भाळवणी, निघोज, कान्हूरपठार, वडझिरे येथील आठवडे बाजार या आठवड्यात बंद ठेवण्याचा निर्णय तहसीलदार ज्योती देवरे यांनी घेतला आहे. करोना आजाराची साथ बाबत उपाययोजना करण्यासाठी ज्योती देवरे यांनी पारनेर मधील अधिकारी, डॉक्टर, औषध विक्रेते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी तहसीलदार ज्योती देवरे म्हणाल्या, कोरोना आजार विषयी सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवत आहेत सर्व यंत्रणांनी अशा अफवांना वेळीच रोखले पाहिजे. .तहसीलदार देवरे यांनी सर्वाना कोरोना आजार अफवा पसरू नये याची दखल घ्यावी.यावेळी तहसीलदार देवरे यांनी सर्वाना आजाराच्या उपाययोजना विषयी शपथ दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लालगे यांनी कोरोना विषयी माहिती दिली. मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र औटी,,डॉ नरेंद्र मुळे, डॉ संदीप औटी, डॉ बाळासाहेब कावरे यांनी काही सूचना मांडल्या.