Breaking-news

#CoronaVirus: औरंगाबादेत कोरोनाचा शिरकाव; एक संशयित तर चारजणांना निरीक्षणाखाली ठेवले

औरंगाबाद | महाईन्यूज

राज्यात पुणे आणि मुंबईनंतर औरंगाबादमध्येहीकोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. परदेशातून परतलेल्या चारजणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली असता खबरदारी म्हणून घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश येथून आलेल्या एका १६ वर्षीय संशयित रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

जगभर थैमान घालत असलेला कोरोना व्हायरसचे राज्यात रुग्ण आढळून आली आहेत. पुणे नंतर कोरोना व्हायरसने शहरात धडक दिली आहे. दुबई आणि इटली येथून परतलेल्या चार जणांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यात एकाही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. तरीही या चार जणांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button