विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठ समितीनं दडपला चौकशी अहवाल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/13-2.jpg)
कोल्हापूर |महाईन्यूज|प्रतिनिधी
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात 2012 ते 14 या काळात विद्यार्थिनींकडून लैंगिक छळाच्या तक्रारी आल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात होती. मात्र, या समितीने चौकशी अहवाल दडपल्याचा आरोप स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉ. मेधा नानिवडेकर यांनी केला आहे. विद्यमान कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे हे या प्रकरणात लक्ष देत नसल्याने कुलपतींकडे याबाबत तक्रार करणार असल्याचेही डॉ.नानिवडेकर यांनी सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण?
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात 2012 ते 14 या काळात विद्यार्थिनींकडून लैंगिक छळाच्या तक्रारी आल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने एक समिती नेमण्यात होती. समितीने प्रकरणाची चौकशीही केली. मात्र, जून 2016 पासून हा चौकशी अहवाल दडपून ठेवला आहे. या अहवालाची प्रत याचिकाकर्त्यांना उपलब्ध करून द्यावी आणि संबंधित प्रकरणांमधील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. मेधा नानिवडेकर यांनी केली आहे.
विद्यमान कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे या प्रकरणात लक्ष देत नसल्याने कुलपतींकडे याबाबत तक्रार करणार असल्याचेही डॉ.नानिवडेकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठात आता स्त्री अभ्यास केंद्राकडून ‘विद्यापीठ बचाव’चा नारा देण्यात आला आहे. मागणी करूनही कुलगुरू भेटत नसल्याचेही डॉ. नानिवडेकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे याबाबत विद्यापीठ प्रशासन अथवा कुलगुरू काय स्पष्टीकरण देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.