‘महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत होणार बंडखोरी?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/10-3.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
मध्यप्रदेशातलं काँग्रेसचं सरकार संकटात सापडलं आहे. पक्षाला मोठं खिंडार पडलं असून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या 21 समर्थक आमदारांनी राजीनामे दिलेत तर 6 मंत्र्यांची मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हकालपट्टी केली आहे. शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमधल्या असंतोषाचा फायदा भाजपने घेतला असून त्याचे पडसाद इतर राज्यांमध्येही उमटण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, काँग्रेसला आपले नेते सांभाळता येत नाहीत. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिनही पक्षात बंडखोरी होणार असल्याचं भाकीत त्यांनी व्यक्त केलं.
आठवले म्हणाले, ज्योतिरादित्य शिंदे हे मराठी भाषिक आहेत, मुळचे महाराष्ट्रीयन आहेत. त्यांची आजी ही पूर्वी भाजपमध्येच होती. त्यामुळे त्यांनी घरवापसी केली आहे. भाजप ने फोडाफोडी नाही केली. काँग्रेसला त्यांच्या पक्षात नेते संभाळता येत नाहीत. उद्वव ठाकरे यांनी आमच्याकडं यावं. तसं झालं तर मजबूत सरकार राज्यात अस्तित्वात येईल. लवकरच तिनही पक्षांत बंडखोरी होणार असून महाराष्ट्रातला महाविकास आघाडीचा एक नेता संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटी त्यांनी केला.