भाजपचे संपर्क अभियान; केंद्र सरकारची चार वर्षातील कामगारी पोहोचणार घरोघरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/dc-Cover-btem15j5p5j9g1dhqa23dir8f4-20160303005540.Medi_.jpeg)
पिंपरी- केंद्रातील भाजप सरकारने गेल्या चार वर्षात सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शहर भाजप संपर्क अभियान राबवित आहे. त्यामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींसाठी वेगवेगळी संम्मेलने आयोजित केली जाणार आहेत. संयोजनाची जबाबदारी पदाधिका-यांवर सोपविण्यात आली आहे.
केंद्र सरकारने चार वर्षाचा कार्यकाळ नुकताच पूर्ण केला आहे. या चार वर्षामध्ये केंद्र सरकारने मेक इन इंडिया, स्टार्ट अप, जनधन अशा विविध प्रकल्प यशस्वीपणे राबविल्याचा दावा स्थानिक भाजपच्या नेत्यांनी केला आहे. त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी संपर्क अभियान हाती घेतले आहे. अभियानाच्या संयोजनांची जब्बदारी भाजपच्या सर्वच गटातील नेत्यांना दिली आहे.
संपर्क अभियानांतर्गत विशेष संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. बुध्दीजीवी संमेलन, समरसता संपर्क, स्वच्छता अभियान, बाईक रॅली, ज्येष्ठ नागरिक संपर्क, बुथ संपर्क अभियान घेण्यात येणार आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना मोदी सरकारच्या कामाची जाणिव करून दिली जाणार आहे. त्याची जबाबदारी राज्यसभा खासदार अमर साबळे, उमा खापरे, आझम पानसरे, आमदार महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, प्रमोद निसळ आदींवर सोपविली आहे.