Breaking-newsक्रिडा
सुपरकिंग्जसमोर सनरायझर्सचे आव्हान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/cskvsrh-.jpg)
मुंबई : मुंबईचे वानखेडे स्टेडियम आयपीएलच्या शेवटच्या सामन्यासाठी सज्ज झाले आहे. याच वानखेडे स्टेडियममधून सात एप्रिलला आयपीएलच्या अकराव्या मोसमाचा रथ निघाला होता. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला हरवून नव्या मोसमाची विजयी सलामी दिली होती. चेन्नईच्या त्याच फौजेने मग वानखेडे स्टेडियमच्याच साक्षीने फायनलमध्ये धडक मारली.
आता आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरायचे तर चेन्नईसमोर आव्हान आहे ते सनरायझर्स हैदराबादचे. कोण होणार आयपीएलच्या अकराव्या मोसमाचा चॅम्पियन…केन विल्यमसनची सनरायझर्स हैदराबाद की महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्स? दक्षिणेच्या याच दोन फौजांमध्ये आज संध्याकाळी सात वाजता आयपीएलची फायनल रंगणार आहे. ऑरेंज आणि यलो आर्मीमधल्या या लढाईच्या निमित्ताने सारे वानखेडे स्टेडियम भगव्या आणि पिवळ्या रंगात जणू न्हाऊन निघणार आहे.