कोरोना व्हायरसची भीती इतकी, की चीनमध्ये लोक चक्क 4 फूटांवरून कापतायत केस

जगभरात कोरोना व्हायरसची भीती दिवसेंदिवस वाढते आहे. एकीकडे त्याविषयी प्रतिबंधात्मक लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या व्हायरसची लागण होऊ नये याकरता लोक अनेक उपाय करताना दिसता आहेत. चीनमध्ये केस कापताना कोरोना व्हायरसची लागण होऊ नये या करता अजब उपायाचा शोधण्यात आला आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातला आहे. आत्तापर्यंत चीनमध्ये 3000 लोकांचा मृत्यू झाला असून 80000 पेक्षा जास्त लोकांना या कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. चीनमध्ये लोक कोरोनामुळे इतके भयभीत झालेत की दैनंदिन काम करायला बाहेर जायचंही टाळत आहेत.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नवीन नवीन युक्त्या काढल्या जात आहेत. सलूनमध्ये लोकांचे केस चक्क 4 फूटांवरून कापले जात आहेत. याविषयीचा एक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चीनमध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून अनेक कामं सोप्या पद्धतीने केली जातात. आता तर कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली आहे. हे लोक चीनमधील हेनान भागातील सलूनमध्ये 3 ते 4 फूटावरून केस कापत आहेत.
एका लांब काठीसारख्या वस्तूच्या साहाय्याने लोकांचे केस कापले जात असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. केस कापण्याच्या कात्रीसोबतचं दुसऱ्या काठीला हेयर ब्रश देखील लावण्यात आला आहे. यामुळे दोन्ही व्यक्तींचा संपर्क होत नाही.





