भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Harshwardhan-Jadhav-1.jpg)
नवी दिल्ली | चीनमध्ये (China) पसरलेल्या साथीच्या रोगाने संपूर्ण देशामध्ये रौद्र रुप धारण केलं आहे. भारतालाही याचा धोका जाणवत असून सध्या देशात (India) कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या 28 वर गेली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री (Health Minister) डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे.
दिल्लीमधील एका कोरोनाबाधित रुग्णामुळे आग्र्यातील (Agra) 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर जयपूर (Jaipur) येथे पर्यटनासाठी आलेल्या इटालियन (Italian) ग्रुपमधील 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या भारतीय ड्रायव्हरलाही या आजाराची लागण झाली आहे. हैद्राबादमध्ये (Hyderabad) एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.
सध्या केरळात (Kerala) 3 बाधित रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कोरोनाला रोखण्यासाठी परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात असून यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यात आली आहे. आज दुपारी तीन वाजता कोरोनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनामुळे घाबरुन जाऊ नका पण खबरदारी घ्या, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.