Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्यानं खोटे आरोप करत असल्याचा विदया चव्हाण यांचा खुलासा

नातू हवा म्हणून सुनेचा छळ केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, आमदार विद्या चव्हाण  यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. ‘माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत. हे कळल्यानंतर माझ्या मुलानं घटस्फोट घेण्याची तयारी सुरू करताच सुनेनं आरोप केले आहेत. कुणाच्या तरी चुकीच्या सल्ल्यामुळं ती असं वागत असून न्यायालयात खरंखोटं सिद्ध होईल,’ असं मोठा गौप्यस्फोट विद्या चव्हाण यांनी केलाय.

विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि शीतल अशा एकूण पाच जणांविरुद्ध पोलिसांनी छळाचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरी मुलगी झाल्यानं तिचा छळ करण्यात येत होता, असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं होतं. मात्र, हे सर्व आरोप साफ खोटे असल्याचं विद्या चव्हाण यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं. याबाबतचा संपूर्ण घटनाक्रमच चव्हाण यांनी सांगितला.

चव्हाण म्हणाल्या, ‘१० डिसेंबर रोजी माझा मुलगा कामानिमित्तानं डेन्मार्कला कंपनीच्या ट्रेनिंगसाठी जाणार होता. त्याच्या काही दिवस आधी त्याला सुनेच्या मोबाइलवर काही आक्षेपार्ह मेसेज आढळले. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं त्यातून समोर आलं. त्याला धक्का बसला. त्यानं त्याबाबत आम्हाला सांगितलं. नंतर गौरीशी (माझ्या सुनेशी) बोलून वेगळं होण्याचा त्याचा निर्णय सांगितला. आपल्या सगळ्या गोष्टी उघड झाल्याचं लक्षात येताच तिनं वकिलांचा सल्ला घेतला आणि आरोप सुरू केले. तिनं आमच्याविरोधात ३ कोटींचा दावाही केलाय. अर्थात, ती खोटं बोलते आहे हे यथावकाश समोर येईल. प्रकरण न्यायालयात असल्यानं मी त्यावर अधिक बोलू शकत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group