WOW! जेम्स बॉन्ड बोलणार मराठीत डायलॉग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-5.png)
जेम्स बॉन्ड या पात्राने आतापर्यंत अनेकांची मने जिंकली आहेत. आता या जेम्स बॉन्डच्या सीरिजमधील २५वा चित्रपट ‘नो टाइम टू डाय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर प्रादेशिक १० भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/notimetodie27022020_c-789x1024.jpg)
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे ‘नो टाइम टू डाय’ चित्रपटाचा ट्रेलर १० भाषांमध्ये प्रदर्शित झाल्याचे सांगितले आहे. ”नो टाइम टू डाय’ चित्रपटाचा ट्रेलर १० भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी, भोजपुरी, बंगाली, मल्याळम या भाषांमध्ये तो प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या २ एप्रिलला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट इंग्रजी,मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे’ असे ट्विट केले आहे. मराठीतील या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे..
‘नो टाइम टू डाय’ या चित्रपटात अभिनेते डेनियल क्रेग जेम्स बॉन्डची भूमिका सारकाणार आहेत. त्यांनी आतापर्यंत सर्वात जास्त काळ जेम्स बॉन्डची भूमिका साकारली आहे. डेनियल यांनी २००६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कसिनो रॉयाल’ चित्रपटात जेम्स बॉन्डची भूमिका साकारत सुरुवात केली होती.