Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
इराणच्या उपराष्ट्रपतींना ‘corona’ ची लागण…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-231.png)
कोरोनामुळे चीनमध्ये २८०० हून अधिक बळी गेले आहे. चीननंतर अनेक देशांत या रोगाचा फैलाव झाला आहे. इराणमध्येही कोरोनामुळे २६ जण मृत्युमुखी पडले आहेत. इराणच्या उपराष्ट्रपती मासूमेह इब्तिकार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मासूमेह इब्तिकार यांच्यावर उपचार सुरु आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/skynews-masoumeh-ebtekar-iran_4932547-1024x576.jpg)
इराणमध्ये १९ फेब्रुवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर दहा दिवसांत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या २४५ वर पोहोचली त्यातल्या २६ जणांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर इराणमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
वुहान हे कोरोनाचं केंद्रबिंदू आहे. इथे कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. चीन, जपान, भारत, अमेरिका सारख्या देशांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.