Breaking-newsराष्ट्रिय
पीएफवर पाच वर्षांतील सर्वांत कमी व्याजदर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/money-2000-1.jpg)
नवी दिल्ली – कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेने (ईपीएफओ) 2017-18 या आर्थिक वर्षासाठी 8.55 टक्के इतका व्याजदर देण्याबाबतचा आदेश देशातील 120 हून अधिक फिल्ड ऑफिसेसना जारी केला आहे. हा व्याजदर पाच वर्षांतील सर्वांत कमी आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याआधीच मागील आर्थिक वर्षासाठीच्या व्याजदराला मंजुरी दिली होती. मात्र, कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्याने त्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. ईपीएफओने 2016-17 वर्षासाठी 8.65 टक्के, 2015-16 वर्षासाठी 8.80 टक्के, 2014-15 आणि 2013-14 या
वर्षांसाठी प्रत्येकी 8.75 टक्के व्याजदर दिला होता. त्यामुळे सुमारे 5 कोटी पीएफ अकाऊंटधारकांच्या खात्यांमध्ये पाच वर्षांतील सर्वांत कमी व्याजदर जमा होणार आहे.