‘स्वीटी सातारकर’चा धमाकेदार ट्रेलर लाँच…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-158.png)
‘तू जेव्हा थैलीत होता ना तेव्हा मी पहिलीत होते’, ‘साडी बघायच्या वयात हा गाडी का बघतोय…’, असे खटकेबाज संवाद असलेली आगळीवेगळी प्रेमकहाणी आता प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. ‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. अवघ्या काही तासातच या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुनाफ नाईक, संतोष साबळे यांनी निर्मिती केलेल्या ‘स्वीटी सातारकर’ चित्रपटाचे दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केले आहे. सुमित गिरी यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. , संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे या कलाकारांनी काम केले आहे.
हलकीफुलकी कथा, उत्तम कलाकार, तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असलेला हा चित्रपट निश्चितपणे प्रेक्षकांची दाद मिळवणार असल्याचं या ट्रेलरवरून कळतं. खटकेबाज संवाद हे तर चित्रपटाचं विशेष वैशिष्ट्यच ठरणार आहे. त्यामुळे ज्या तरुणावर स्वीटी सातारकर जीव ओवाळून टाकते, तिला तो मिळणार का, याचे उत्तर येत्या २८ फेब्रुवारीलाच प्रेक्षकांना मिळणार आहे.