‘भारत आपली वाट पाहतोय”…नरेंद्र मोदींकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौ-याबाबत ट्विट!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-155.png)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील लष्करी तळावरून डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्यासोबत येणारे कुटुंबीय व वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ शनिवारी रात्री रवाना झाले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Capture-43.png)
जवळपास 14 तासांचा प्रवास करून त्यांचे ‘एअर फोर्स वन’ हे खास विमान सोमवारी सकाळी 11.30 वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर पोहोचणार आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना रिट्विट केले आहे. यामध्ये नरेंद्र मोदींनी लिहिले आहे की, “भारत आपल्या दौऱ्याची वाट पाहत आहे. हा दौरा निश्चितच आपल्या देशांमधील मैत्री आणखी दृढ करेल. लवकरच आपली अहमदाबादमध्ये भेट होईल.”
डोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी प्रत्येकी पाच वर्षांच्या अंतराने अनुक्रमे बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश व बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला होता. इतरांच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यात दोन बाबतीत लक्षणीय फरक आहे. इतरांनी भारतासोबत पाकिस्तान किंवा शेजारच्या अन्य देशांनाही भेटी दिल्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प मात्र फक्त भारताचा दौरा करणार आहेत. दुसरे असे की, इतर राष्ट्राध्यक्षांचे दौरे शासकीय व राजनैतिक पातळीवरचे होते.