Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिवसेनेनं नाणारवरून यू-टर्न घेतल? उद्धव ठाकरेंच स्पष्टीकरण…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-132.png)
सामनातील नाणारसंदर्भातील जाहिरातीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या पहिल्या पानावर नाणारची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर शिवसेनेनं नाणारवरून यू-टर्न घेतल्याची चर्चा कोकणात सुरू होती. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे.
पत्रकारांनी सामनातून छापून आलेल्या जाहिरातीसंदर्भात विचारले असता, उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केलं आहे. शिवसेनेचं धोरण आणि निर्णय मी ठरवतो आणि ते सामनातून मांडले जातात. कोणताही जाहिरातदार सेनेची भूमिका ठरवत नाही. जाहिरात आली म्हणजे शिवसेना बदलली, असं होत नाही. अशा वेगवेगळ्या जाहिराती रोज येतात, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओरोस येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.