11 आदिवासी अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार
![Rape by showing the lure of marriage, trustee of Mahim Dargah Dr. Allegations against Mudassir Nisar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/728812-rape-crime.jpg)
पुणे |महाईन्यूज |प्रतिनिधी|
पंचगनी येथील एका बोर्डिंग स्कूलमध्ये 11 आदिवासी विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
11 मुले शाळेची भिंत ओलांडून पळून जात असताना या प्रकरणाचा खुलासा झाला. मुले शाळा सोडून पळून जात असताना स्थानिक लोकांनी त्यांना अडवले आणि याबाबत कारण विचारले. यानंतर मुलांनी शाळेत घडत असलेला सर्व प्रकार सांगितला. लोकांनी फोनवरून मुलांच्या कुटुंबीयांना संबंधित माहिती दिली आणि पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिस या प्रकरणाची तपास करत आहेत.
पंचगनी पोलिस स्टेशनचे मुख्य अधिकारी या मुलांना सातारा येथील निरीक्षण गृहात घेऊन गेले आहेत. तेथे बाल कल्याण समितीचे अध्यक्ष आणि जिल्ही प्रशासनाने मुलांची चौकशी केली. यावेळी मुलांनी सांगितले की, शाळेतील शिक्षक आणि शाळा प्रशासन त्यांना त्रास देत असून त्यांचे लैंगिक शोषण केले जात होते.