इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याबाबत अधिकाऱ्यांना शरद पवार यांचे निर्देश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Screenshot_20200211_193811.jpg)
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
इंद्रायणी नदी प्रदूषणाच्याबाबतीत दोन – तीन वर्षाचा कार्यक्रम हाती घेऊन इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथील बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
शिवाजीनगर पुणे येथील साखर संकुलात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली इंद्रायणी नदी प्रदूषण सद्यस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका आयुक्त,पुणे महानगरपालिका आयुक्त, तसेच पीएमआरडीए मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रदूषणाच्या बाबतीत चर्चा करण्यात आली. नदीमध्ये होत असलेले प्रदूषण त्याच्यावर काय उपाय केले पाहिजे. त्यासाठी किती खर्च येणार आहे आणि केंद्रशासनाकडून निधी किती उपलब्ध करायचा, राज्य शासनाकडून किती निधी उपलब्ध करायचा व उर्वरित निधी कोणकोणत्या माध्यमातून उपलब्ध करता येईल याबाबत सविस्तर चर्चा झाली.