पाकिस्तानी नागरिकांची भारत चीनमधून करणार सुटका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/orona.jpg)
कोरोना व्हायरसने चीनमध्ये शेकडो लोकांचा बळी घेत थैमान घातले आहेत. येथून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास मदत केल्याबद्दल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे आभार मानले आहेत. तसेच वेळ पडल्यास किंवा पाकिस्तान सरकारच्या विनंतीनंतर चीनमधील पाकिस्तानी नागरिकांची सुखरूप सुटका करण्याची तयारी असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांना एका पत्रकाराने पाकिस्तानी विद्यार्थांची चीनमधून भारत सुटका करेल का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना रवीश कुमार म्हणाले की,’ पाकिस्तान सरकारने सध्या आम्हाला तशी विनंती केली नाही. मात्र, तशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर आम्ही नक्की विचार करू.’ कोरोनामुळे चीनमध्ये अडकलेले पाकिस्तानी विद्यार्थी मोदी है तो मुमकिन है, मोदी जिंदाबादचे नारे देत आहेत, असं रवीश कुमार यांना विचारलं असता त्यांनी यावर फक्त स्मित हास्य केलं.चीनच्या नागरिकांना देण्यात आलेले नॉर्मल आणि इ-व्हिसा अधिकृत आणि वैध नसल्याचे रवीश कुमार यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. जर एखाद्या चीनमधील व्यक्तीला भारतात यायचं असल्यास त्यांना भारताच्या दूतवासाशी संपर्क साधून व्हिसासाठी अर्ज करावा लागेल, असेही कुमार म्हणाले आहेत.