पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रीराम जन्मभूमीबाबत लोकसभेत मोठी घोषणा…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-8.png)
दिल्ली | महाईन्यूज |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम जन्मभूमीबाबत लोकसभेत मोठी केली.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर ट्रस्टबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिराबाबत एक योजना तयार करण्यात आली आहे. राम मंदिरासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ट्रस्ट स्थापन करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं…
राम मंदिर देशातील कोट्यावधी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. राम जन्मभूमीच्या आणि राज मंदिर निर्मितीच्या विषयावर मी बोलत आहे, हे मी माझं भाग्य समजतो. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला 67 एकर हस्तांतरित करण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केली. तर 5 एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्डालाही देणार असून उत्तर प्रदेश सरकारने याला मंजुरी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.