मीडियाच्या साक्षीने उत्तर कोरियाने नष्ट केले अण्वस्त्र चाचणी केंद्र
प्यॉंगप्यांग (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियाने परदेशी मीडियाच्या साक्षीने आपले अण्वस्त्र चाचणी केंद्र नष्ट केले आहे. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार पुंग्ये-री येथील हे अण्वस्त्र चाचणी केंद्र स्फोट घडवून नष्ट करण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी आणि त्याला प्रसिद्धी देण्यासाठी जगभरातील अनेक पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते. या पत्रकारांना बीजिंगहून उत्तर कोरियाची राजधानी प्यॉंगयोंग येथे नेण्यात आले आणि तेथून पूर्व किनाऱ्यावरील पुंग्ये-री येथे असलेल्या अण्वस्त्र चाचणी केंद्राकडे नेण्यात आले.
उत्तर कोरियाचे हुकूमशहा कोम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींबरोबर झालेल्या शिखर परिषदेनंतर अण्वस्त्र चाचणी केंद्र नष्ट करणार असल्याचे आणि त्यासाठी तारखाही जाहीर केले होते. हवामानाच्या लहरीवर 24-25-26 मे रोजी ही कारवाई करण्याचे योजिले होते, त्यानुसार आज कारवाई करण्यात आली. अण्वस्त्र चाचणी केंद्र नष्ट करण्याकडे ट्रम्प-किम जोंग उन शिखर परिषदेपूर्वीची एक सद्भावना कृती म्हणून पाहिले जात आहे.
पुंग्ये-री येथील जमिनीखालील या चाचणे केंद्रात उत्तर कोरियाने सहापैकी पाच अण्वस्त्र चाचण्या केल्या होत्या. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सहावी अण्वस्त्र चाचणी केली होती.