Breaking-newsपुणे
डंपरने धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू
पुणे– डंपरने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी 10 वाजता हांडे लॉन्स, हांडेवाडीच्या समोर, हडपसर येथे घडली. याबाबत हडपसर पोलिसांनी अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजनी बरेला (वय 33, रा. वडकी, मूळ. मध्य प्रदेश) हे पत्नी बालिबाई (वय 28) यांच्यासह दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे बालिबाई यांचा तोल गेला. त्या दुचाकीवरून खाली पडल्या. डंपरच्या चाखाखाली गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर संबंधित डंपर चालक तेथे न थांबता, अपघाताची माहिती न देता पळून गेल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक शेंडगे अधिक तपास करत आहेत.