पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचा दणका, 13 पोलीस निरीक्षकांची केली उचलबांगडी
- पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी काढला बदलीचा आदेश
- आयुक्तालयाच्या अंतर्गत पोलीस ठाण्यात झाल्या बदल्या
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयअंतर्गत विविध पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह कनिष्ठ पोलीस निरीक्षक अशा एकूण 13 अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी (दि. 26 जानेवारी) आस्थापना मंडळाने याबाबतचा निर्णय घेतला. त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी निरीक्षकांच्या बदलीचा आदेश काढला.
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांची बदली युनिट 3 गन्हे शाखेत अतिरिक्त कार्यभार ‘एमओबी’ देण्यात आला आहे. विनंतीवरून त्यांची बदली करण्यात आली आहे. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांची बदली वाहतूक शाखेत करण्यात आली आहे. त्यांचीही बदली विनंतीवरून करण्यात आली. तर, प्रशासकीय कारणास्तव पोलीस नियंत्रण कक्षातील पुढील अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे यांची बदली पिंपरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने यांची बदली चिखली पोलीस ठाण्यात झाली आहे. युनिट 3 गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांची वाकड पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र राजमाने यांची रावेत चौकीत प्रभारी म्हणून बदली झाली आहे. चिखली पोलीस ठाण्याचे गणेश जवादवाड यांना निगडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी जबाबदारी देण्यात आली आहे.
तर, तेथील पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र निकाळजे यांची बदली पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेत झाली आहे. संगणक विभागातील शहाजी पवार यांची बदली तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे पदावर झाली आहे. भोसरीचे वाहतूक पोलीस निरीक्षक अरुण ओंबासे यांची बदली निगडी वाहतूक विभागात झाली आहे. आळंदी वाहतूक पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांची बदली भोसरीच्या वाहतूक विभागात झाली आहे.
पोलीस निरीक्षक गुन्हे देवराम चव्हाण यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात झाली आहे. त्यांनी वैद्यकीय कारणास्तव बदलीचा अर्ज केला होता. तर, निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे यांची बदली याच पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेत झाली आहे. पदनामात बदल करून प्रशासकीय कारणास्तव त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.