मुख्यमंत्री केजरीवालांचा राेड शाे ; प्रचार सभेत पाच वर्षांत केलेल्या कामांची दिली माहिती

नवी दिल्ली | मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी राेड शाे काढला हाेता. बादी मतदारसंघात त्यांनी आपचे उमेदवार अजेश यादव यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत पाच वर्षांतील कामांचा पाढा वाचून दाखवला.
आप सरकार शाळा, शिक्षण व्यवस्था, आराेग्य व्यवस्थेत सुधारणेसाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे ८ फेब्रुवारी राेजी मतदान करताना कुटुंबाच्या कल्याणाचा विचार करून पुन्हा सेवेची संधी देण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले. या वेळी बाल्कनीत उभ्या असलेल्या महिलांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. दिल्लीतील गल्लीबाेळातून जाताना केजरीवाल यांच्या वाहनासाेबत समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली.
काँग्रेसने दिल्लीसाठी साेनिया गांधींसह ४० स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. त्यात सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा, राहुल गांधी यांचाही समावेश आहे. त्याशिवाय डाॅ. मनमाेहन सिंग, गुलाम नबी आझाद, कॅप्टन अमरिंदर सिंग, अशाेक गेहलाेत, मुख्यमंत्री कमलनाथ, मुख्यमंत्री भूपेश बघेल, मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी यांचा समावेश आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा |




