breaking-newsराष्ट्रिय

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला. पाकच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनी जशास तसे चोख उत्तर दिले. बुधवारी मध्यरात्री उरी सेक्टरमध्ये कमलकूट परिसरात पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करीत गोळीबार केला.

पाकच्या रेंजर्सनी मशीनगन आणि मॉर्टारमधून गोळीबार केला. जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या परिसरात पाककडून गोळीबार केला जात आहे. या गोळीबारात सांबा सेक्टरमध्ये तीन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू, कठुआ आणि सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करीत गावांना आणि चौक्यांना लक्ष्य केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button