Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिल्ली विधानसभा : निवडणूक प्रचारासाठी भाजपाची ४० जणांची ‘फौज’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Delhi-Vidhansabha.jpg)
नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रचारासाठी तब्बल ४० जणांची फौज तयार केली आहे. ‘स्टार प्रचारकांच्या’ यादीत सहाजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत.
पंतप्रधानांसह अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी, सनी देओल, हंस राज हंस, गौतम गंभीर, रवी किशन आणि दिनेश लाल यादव यांना ‘निरहुआ’ आदींचा समावेश आहे.
तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह इतर काही जणांची नावे आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/BJP.jpg)