‘गुगल व्हॉइस सर्च’ चा उपयोग आहे मजेशीर आणि फायदेशीर…
एखाद्या माहितीचा शोध घेण्यासाठी, उत्तर मिळविण्यासाठी आपण संबंधित प्रश्न ‘गुगल’ ही वेबसाइट सुरू करून त्यात टाइप केलं की, त्याचे उत्तर, संबंधित माहिती आपल्याला दाखवली जाते. तेथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून ती माहिती आपण वाचू-पाहू शकतो. ‘गुगल’ ने स्मार्टफोनमध्ये ‘गुगल असिस्टंट’ (Google Assistant) ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे तंत्र शिकल्यास छोटी छोटी कामे करणे ज्येष्ठांना सोपे जाईल. तिचा वापर कसा करायचा हे जाणूण घेऊयात…
गुगल असिस्टंट ओपन केल्यावर आपल्याला एक व्हॉइस मेसेज ऐकायला मिळेल आणि या सुविधेची (Google Assistant) माहिती दिसायला लागेल. या सुविधेअंतर्गत आपण सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये सूचना देऊ शकतो. या सुविधेनुसार आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह असलेल्या फोन नंबरवर फोन लावू शकतो. त्यासाठी ‘make a call to…’ अशी सूचना दिली. फोनमध्ये दोन सिम कार्ड असतील, तर स्क्रीन वरील दिलेल्या पर्यायांपैकी एक सिम निवडावे. त्यानंतर लगेच फोन डायल केला जाईल.
‘गुगल’ असिस्टंटला तोंडी सूचना देऊन आपण एखाद्याला मेसेजही (SMS) पाठवू शकतो. त्यासाठी ‘make sms to…(कॉन्टॅक्टचे नाव) अशी सूचना द्यावी. त्यानंतर मेसेजचा मजकूर टाइप करून सेंड बटनावर क्लिक केल्यानंतर मेसेज पाठवला जाईल. गुगल मॅपवर एखादे ठिकाण पाहायचे असेल, तर तशी सूचनाही देता येते. ‘where is mumbai…’ असे विचारले, तर मॅपवर मुंबईचे लोकेशन दिसायला लागेल.
‘गुगल असिस्टंट’ ला वेगवेगळे प्रश्न आपण विचारू शकतो. उदाहरणार्थ ‘ कोणतंही गाणे लावायला सांगितल्यावर ‘गुगल’ वर आपल्याला आपल्याला हवे असलेलं गाणं दिसायला लागेलं…
यामध्ये आपण पुढील २४ तासांतील कोणत्याही वेळेचा अलार्म लावू शकतो. त्यासाठी उदा. ‘set allarm at 7 am for tomorrow’ अशी सूचना दिल्यास, अलार्म लावला जाईल. व्हॉइस सर्चची सोय ‘गुगल मॅप’ मध्येसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथे दिलेल्या माइकच्या चिन्हावर क्लिक करून आपण प्रश्न विचारून ठिकाणांची माहिती मिळवू शकतो.
‘स्मार्टफोन’ मध्ये ‘गुगल’ एप ओपन करून उजव्या बाजूला दिलेल्या माइकच्या चिन्हावर क्लिक केलं की माइकच्या चिन्हावर क्लिक करताच खालच्या बाजूला ‘listening’ असा शब्द दिसायला लागेल. त्या वेळी आपण ‘ओके गुगल’ असे शब्द फोन थोडा जवळ धरून बोललं की आपल्याला हव्या त्या सुचना आपण देऊ शकतो…