महाराष्ट्राचा तमाशा आता रंगणार दिल्लीच्या फडावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/tamasha-Maharashtra.jpg)
मुंबई | महाईन्यूज
‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालया’च्या (एनएसडी) द्वितीय वर्षांतील विद्यार्थ्यांनी सोमवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या तमाशाचे सादरीकरण केले. भारतभरातून आलेल्या या अमराठी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून तमाशा रंगवला आहे. पुढे या तमाशाचे दिल्लीतही प्रयोग होणार आहेत.
गेल्या एका महिना एनएसडीचे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत तमाशाचे प्रशिक्षण घेत होते. एनएसडी दरवर्षी द्वितीय वर्षांच्या विद्यार्थाना एखाद्या राज्यात पाठवून तेथील लोककलेचा अभ्यास करून सादरीकरणाची संधी देत असते. या वर्षी महाष्ट्रातल्या पारंपरिक तमाशाची निवड करण्यात आली होती. या प्रशिक्षणाअंतर्गत या विद्यार्थ्यांनी केवळ विद्यापीठाच्या चौकटीत राहून सैद्धांतिक शिक्षण घेतले नाही तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात जाऊ न अस्सल तमाशाही अनुभवला. नाशिक येथे कै. विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळात जाऊन ‘कनातीतला फडाचा तमाशा’ तर सणसवाडीत जाऊन रेश्मा वर्षां परितेकर यांचा ‘संगीत बारीचा तमाशा’ दाखवण्यात आला आहे.