मी ब्राह्मण विरोधी नसुन ब्रम्हामण्यवादा विरुध्द आहे – जितेंद्र आव्हाड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/8-10.jpg)
इंग्रजांप्रमाणे मोदी शहांना पळवून लावू – जितेंद्र आव्हाड
औरंगाबाद |महाईन्यूज।
एनसीआर, सीए, एनपीआर कायदा म्हणजे मनूचा पुनर्वजन्म आहे. बाबासाहेबांनी मनूस्फुर्ती जाळुन जातीयवाद नष्ट केला. आता दिल्ली व नागपुरवाले देशात हा कायदा लागु करुन जातीवाद फैलवत असल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यांनी पैठण येथे केला.
देशात लागु केलेल्या सीए कायद्याच्या विरोधात सोमवारी पैठण शहरात सर्व पक्षीय महारँली काढुन विरोध दर्शविण्यात आला. यामहारँलीत मुस्लिम नागरीकांसह विविध जातीधर्मातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नेहरू चौकातुन या महारँलीची सुरुवात झाली.खंडोबा चौकात महारँलीचे रुपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी आव्हाड यांनी मोदी शहा यांचे नाव न घेता त्यांच्यावर कडाडून हल्ला केला.
मी ब्राह्मणांच्या विरोध बोलतो असा प्रचार केला जातो. पंरतु मी ब्राह्मण विरोधी नसुन ब्रम्हामण्यवादा विरुध्द आहे. दिल्ली व नागपूर येथील काही मनूवादी विचारसरणीचे लोक देशाचे संविधान हाटवुन पुन्हा मनूस्फुर्ती लागु करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा डाव आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही. जस इग्रंजांना शस्त्रा विना पळवुन लावले. तसेच मोदी शहाना पळवुन लावु असा इशारा यावेळी आव्हाड यांनी दिला. यावेळी नगरसेवक हसनोद्दीन कटयारे, यांनी सर्वांचे आभार मानले. माजी मंत्री अनिल पटेल, दत्ता गोर्डे, आप्पासाहेब निर्मळ, विनोद तांबे, रविंद्र काळे, रवींद्र शिसोदे विलास भुमरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.