breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

दीपिकाने केलेल्या टिक-टॉक व्हिडीओमुळे होतेय ट्रोल…

एसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने मुख्य भूमिका साकारली आहे. ‘छपाक’मधील दीपिकाचा अभिनय पाहिल्यानंतर अनेकांनी तिचं कौतुकदेखील केलं. मात्र आता तेच चाहते तिच्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळतायत… त्यामागचं कारणही तसंच आहे. सध्या सोशल मीडियावर दीपिकाचा छपाकचं प्रमोशन करणारा टिक टॉक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. परंतु ज्या पद्धतीने तो व्हिडीओ शूट केला आहे त्यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘छपाक’चं प्रमोशन करण्यासाठी दीपिका आणि टिक टॉक स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाबीने एक व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओमध्ये दीपिकाने फाबीला तिच्या आवडीच्या तीन चित्रपटांमधील लूक्स रिक्रिएट करण्याचं चॅलेंज दिलं. यामध्ये ‘ओम शांती ओम’, ‘पीकू’ आणि ‘छपाक’ या चित्रपटांमध्ये दीपिकाने जो लूक केला होता तो फाबीला रिक्रिएट करायचा होता. मात्र हे चॅलेंज नेटकऱ्यांना फारसं पटलं नाही. यात छपाकमधील लूक रिक्रिएट करण्यास सांगितल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

अनेकांनी तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत तिला ट्रोल केलं आहे. दीपिकाने केलेला ‘हा व्हिडीओ अत्यंत लाजीरवाणा आहे’, असं काहींनी म्हटलं आहे. तर ‘निदान दीपिकाने तरी असं करायलं नको होतं’, असं काहींचं मत आहे.दरम्यान, दीपिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. छपाक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिने ट्विटवरदेखील तिचं नाव बदलून मालती असं केलं होतं. सध्या या चित्रपटाचं ती जोरदार प्रमोशन करत आहे. मात्र टिक टॉक व्हिडीओमुळे तिच्यावर चांगलंच ट्रोल होण्याची वेळ आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button