कर्नाटक पोलिसांची मुजोरी, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना घेतले ताब्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Yedrawar.jpg)
बेळगाव । महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभुमावर आज राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव ते बेळगाव येथे गेले होते. ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्यांना सीमेबाहेर सोडून दिले. या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध केला आहे.
भाषावार प्रांत रचनेची घोषणा झाल्यावर सीमाभाग कर्नाटकात डांबला गेल्यामुळे सीमाभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी 17जानेवारी 1956 यादिवशी झालेल्या आंदोलनात बेळगाव आणि निपाणी येथे पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते.यामध्ये निपाणी येथील कमलाबाई मोहिते, बेळगाव येथील पैलवान मारुती बेन्नाळकर यांच्यासह अन्य तिघांचा समावेश होता. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात दरवर्षी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते.