‘गंगुबाई काठीयावाडी’ मधली आलिया भटचा हटके लुक…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-59.png)
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘गंगुबाई काठीयावाडी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केल्यापासून हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे. भन्साळी कामाठीपुऱ्यामधील विशेष चर्चिल्या गेलेल्या गंगुबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत झळकणार असून नुकताच तिचा या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Capture-30.png)
या चित्रपटामध्ये ‘द मॅडम ऑफ कामाठीपुरा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गंगुबाई यांच्या जीवनाभोवती कथा फिरताना पाहायला मिळणार आहे.गंगुबाई यांना लहान वयातच वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं होतं. येथे आल्यानंतर त्यांचं संपूर्ण जीवन बदलून गेलं. त्या येथील महिलांना आर्थिक मदत करतात, त्यासोबतच त्यांच्या हक्कासाठीही लढा देतात. वेश्याव्यवसाय करत असताना त्यांची अनेक कुख्यात गुंडांसोबत ओळख झाली होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. हे सारं काही ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/1-17.png)
‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटातील आलियाच्या फर्स्ट लूकचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये एका फोटोत ती भिंतीला टेकून बसलेली आहे. यात तिच्या नजरेमध्ये नैराश्य दिसत आहे तर दुसरीकडे तिच्याच बाजूला एक बंदूकदेखील ठेवल्याचं दिसून येत आहे. तसंच तिने आणखी एक ब्लॅक एण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. यात तिच्या डोळ्यात राग दिसत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही फोटोमधून आलिया तिच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.तसंच या नव्या लुक सोबत नविन कथा आणि हटके काहीतरी पहायला मिळणार आहे हे नक्की…या चित्रपटाची कथा हुसैन जैदी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे.