गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यास नकारात्मक विचार नाहीसे होतात-यशोमती ठाकूर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/yashomati-thakur.jpg)
अमरावती | महाईन्यूज
गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यास नकारात्मक विचार नाहीसे होतात, असं अजब विधान महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेलं आहे. तिवसा तालुक्यातील सार्शी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात यशोमती ठाकूर यांनी गाईवरुन अजब विधान केलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच यशोमती ठाकूर यांनी अजून खिसे गरम झाले नाही, असं विधान करुन वाद ओढावून घेतला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा त्यांनी अजब विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटलेले आहे.
तिवसा तालुक्यातील सार्शी येथे गावाचे दैवतं समजल्या जाणाऱ्या एका मृत गाईच्या पुण्यतिथी निमित्ताने गावात सात दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी समारोपीय कार्यक्रमाला मार्गदर्शन केले आहे. “आपण जे काम करतो, त्याला धर्म मानतो, आपण जो विचार करतो त्याला धर्म म्हणतो, सातत्याने विठ्ठलाचे नामस्मरण केले तर आपल्या आकांक्षा इच्छा पूर्ण होतात. मात्र, विठ्ठलाच्या पाया पडणे म्हणजे झालं असं नाही, आज तरुण युवकांना वेगवेगळ्या पदावर जायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, यासाठी आपण विठ्ठलाचे नामस्मरण केले पाहिजे”, असा सल्ला यशोमती ठाकूर यांनी उपस्थितांना दिलेला आहे.