भारतावर जेवढा आपला अधिकार तेवढाच पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींचाही : अमित शाह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/modi-shaha-Frame-copy-2.jpg)
दिल्ली | महाईन्यूज
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसवाल्यांनो कान उघडे ठेवून नीट ऐका, तुम्हाला जेवढा विरोध करायचा आहे तेवढा करा, आम्ही सर्व लोकांना नागरिकत्व देऊनच शांत बसणार आहोत, भारतावर जेवढा अधिकार माझा तुमचा आहे तेवढाच अधिकार पाकिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध व ख्रिचन शरणार्थींचा देखील आहे. मध्य प्रदेशमधील जबलपुर येथे रविवारी एका रॅलीत ते भाषण करत होते.
राम मंदिराच्या मुद्यावरून कपिल सिब्बल त्यांना देखील टोला लगावला आहे. कपिल सिब्बल म्हणतात की, राम मंदिर नाही बनवले पाहिजे, सिब्बल तुम्ही जेवढी ताकद असेल तेवढी लावून आम्हाला थांबण्याचा प्रयत्न करा, मात्र चार महिन्यात गगनस्पर्शी अशा भव्य राम मंदिराचे निर्माण होणार असल्याचे शाह यांनी बोलून दाखवलेले आहे.
जेएनयूमध्ये काहीजणांनी भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरूंगात टाकायला हवं की नाही? असा प्रश्न करत, जे देशविरोधी घोषणाबाजी करतील त्यांची जागा तुरूंगात असेल, असा इशारा देखील गृहमंत्री शाह यांनी यावेळी दिला आहे.