प्रवाशाचे 70 लाखांचे दागिने लंपास
![Pune crime 58 Cr rupees fraud with film producer FIR filed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/CRIME-KADI-5.jpg)
पुणे – खासगी प्रवासी बसने प्रवास करणाऱ्या एकाकडील 70 लाख रुपयांचे 2 किलो सोन्याचे दागिने प्रवासादरम्यान लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. शैलेशकुमार साकेत (28,रा. मानखुर्द, मुंबई) याने यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साकेत विजयवाडा ते मुंबई या मार्गावर खासगी प्रवासी बसने प्रवास करत होते. विजयवाडा येथून त्याने दोन किलो सोन्याचे दागिने घेतले होते. हे दागिने पिशवीत ठेवले होते. 19 मे रोजी पहाटे पुणे-सोलापूर महामार्गावर दौंडनजीक कुरकुंभ येथे तिघेजण बसमधून उतरले.
दरम्यान, सोन्याचे दागिने ठेवलेली पिशवी लंपास करण्यात आल्याचे साकेत याच्या निदर्शनास आले. त्याने तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शिवाजीनगर पोलिसांकडून हा गुन्हा तपासासाठी यवत पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपविला आहे. साकेत याच्या पिशवीत दोन किलो 340 ग्रॅम वजनाचे दागिने होते. चोरलेल्या दागिन्यांची किंमत 70 लाख रुपये असल्याचे साकेतने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.