धक्कादायक! अल्पवयीन मुलीची हरयाणात विक्री करत देहव्यापारात गुंतवले
हरयाणात | महाईन्यूज
एका अल्पवयीन मुलीला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन अपहरण केले आहे. त्या मुलीची थेट हरयाणात विक्री करून देहविक्री करण्यास भाग पाडले आहे. तिच्यावर दोन मुलांचे मातृत्व लादल्याप्रकरणी बुधवारी आणखी एका महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मानवी तस्करीच्या या प्रकरणात चंद्रपुरातील दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील त्या दोन महिलांना न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. तर, बुधवारी ताब्यात घेतलेल्या महिलेवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी १० ते १५ आरोपींची मानवी तस्करीची टोळी सक्रिय असून, त्यांच्या शोधार्थ चंद्रपूर पोलीस दलाने पाच पोलीस अधिकारी व तीन कर्मचारी, अशा एकूण आठ जणांचे पथक तैनात केले आहे. चंद्रपुरातील एक अल्पवयीन मुलगी खेळत असताना प्रसादातून गुंगीचे औषध दिले आहे. बेशुद्ध अवस्थेत तिला चंद्रपुरातील एका महिलेने रेल्वेने हरयाणात नेले. रेल्वेप्रवासात असताना पीडित मुलगी शुद्धीवर आली आहे.
अनोळखी व्यक्ती बघून ती रडली पण परत तेव्हा तिला पाण्यातून औषध देण्यात आले. त्यानंतर तिला हरयाणात नेण्यात आले व तिला कारनालमध्ये दोघांना विकले होते. तिथे आठ युवकांनी पिडितेवर अत्याचार केला. महानगरात पीडितेचे कुटुंब शोधत होते. तशी तक्रारही रामनगर पोलिसात नोंदवण्यात आली. मध्यंतरी आरोपी महिलांनी तिची वीस, पंचेवीस हजारात विक्री केली. याच काळात तिचे सात जणांशी लग्नही लावून दिले. पण, तिला काही काळापुरतेच संबंधित व्यक्ती ठेवून घ्यायचे. यातून तिच्यावर दोनदा मातृत्व लादण्यात आले.