सलमानचा ‘लवरात्री’ सिनेमा अडचणीत?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/love-ratri-.jpg)
सलमान खान बॅनर अंतर्गत निर्मित ‘लवरात्री’ चित्रपटावरून प्रदर्शनाआधीच वाद होण्याची चिन्हे आहेत. कारण लवरात्री या चित्रपटाच्या नावावरच विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला आहे. हिंदू सणाच्या नावाचा उल्लेख चित्रपटाच्या नावात असल्याने यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
याविषयी परिषदेच्या इंटरनॅशनल वर्किंग अध्यक्षपदी असणाऱ्या आलोक कुमार यांनी आपली म्हटले कि, आम्ही हा चित्रपट देशातील कोणत्याच चित्रपटगृहात प्रदर्शित होवू देणार नाही. तमाम हिंदूंच्या भावना या चित्रपटाच्या नावामुळे दुखावल्या जाव्यात असे आम्हाला मुळीच वाटत नाही. नवरात्रीच्या संकल्पनेवर आधारित या चित्रपटातून या सणाचा वेगळाच अर्थ प्रेक्षकांपर्यंत जात असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान सलमान खानची बहिण अर्पिता खानचा पती आयुष शर्मा व वारीन हुसैन ही अभिनेत्री पहिल्यांदाच लवरात्री या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. मात्र विश्व हिंदू परिषदेने या चित्रपटावर आक्षेप घेतल्याने लवरात्री प्रदर्शित होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.