महाविकास आघाडीचे सरकार आपोआप पडेल – चंद्रकांत पाटलाची भविष्यवाणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/8-4.jpg)
रत्नागिरी|महाईन्यूज|
आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, तर हे सरकार आपोआप पडणार आहे. चांगली खाती मिळाली नाहीत म्हणून व काही जणांना मंत्रिपद न मिळाल्याने आमदार नाराज आहेत. काहीजण राजीनामा देण्याच्या तयारीत होते, त्यांची समजूत काढली. पण हे फार काळ करता येणार नाही. महिन्याभरातही सरकार पडेल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
स्नेहमेळाव्यासाठी आलेल्या पाटील यांची पत्रकारांनी भेट घेतली असता, ते म्हणाले की, मुस्लिम समाजामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचे गैरसमज दूर करा. हा कायदा नागरिकत्व देण्याचा आहे, काढून घेण्याचा नाही. जगात 182 देशात नागरिकत्व नोंदणी कायदा आहे. देशातील 25 कोटी मुस्लिम जनतेने घाबरण्याचे कारण नाही. आपण बेकायदेशीर राहतो, असे ज्यांना वाटते, ते घाबरले आहेत. अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे संरक्षण होत नसल्याने अफगाणिस्तान, बांग्लादेशमधील अल्पसंख्यांक लोकांना भारतात संधी मिळणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. राज्यातल्या सहा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप महाविकास आघाडीला पुरून उरेल, असा दावाही त्यांनी केला. वारकरी विद्यापीठ व्हायलाच पाहिजे, शिवसेनेच्या भूमिकेचे आम्ही स्वागत आणि सरकारचे अभिनंदनही केले आहे.