Breaking-newsताज्या घडामोडी

कन्हानमध्ये शिवसेना उमेदवाराच्या नातेवाईकाची चाकूने भोसकून हत्या

नागपूर | जिल्ह्यात आज नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. तर उद्या कन्हान नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. अशातच कन्हान नगर परिषदेच्या एका शिवसेना उमेदवाराच्या नातेवाईकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये काल मध्यरात्री ही घटना घडली आहे.

कन्हान नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 9 जानेवारीला होत आहे. प्रचार संपल्यानंतर काल रात्री प्रभाग 8 चे शिवसेना उमेदवार डायनल शेंडे यांचे नातेवाईक संजू खडसे रात्री एका बारमध्ये मद्यपान करत होते. त्याचवेळी बाजूच्या टेबलवर बसलेल्या एका व्यक्तीचा ग्लास या तिघांपैकी एकाच्या अंगावर पडला. यातून वाद झाल्याने त्यांच्यात धक्काबुक्की झाली. दरम्यान, बारमधील लोकांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. मात्र, थोड्या वेळाने बारच्या बाहेर आल्यावर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी तिघांनी संजू खडसे यांच्यावर चाकूने वार करुन घटनास्थळावरुन पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संजू खडसे यांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button