निगडीतील आण्णा भाऊ साठे पुतळा स्वच्छ करा, अन्यथा गुन्हा दाखल करू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/IMG-20200105-WA0007.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसर उद्यान स्वच्छ न ठेवणा-या ठेकेदारावर व आधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.
निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील गार्डनची दयनीय अवस्था झाली आहे. तेथील कारंजे व विद्युत लाईट मोडकळीस आलेल्या आहेत. संबंधित ठेकेदाराचे तसेच उद्यान विभागाच्या आधिका-यांचे उद्यानाकडे जानुनबुजुन दुर्लक्ष होत आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पूर्णाकृती पुतळ्यासमोर शिर्के कंपनीचे पाणीपुरवठा विभागाचे व इतर कामे चालु आसून त्या पुर्णाकृत्ती पुतळ्यावर व परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिसर स्वच्छ न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दाखले यांनी व्हॉट्सअपद्वारे मजकूर पाठवून केले आहे. शिर्के कंपनी व्यस्थापन आणि पिंपरी चिंचवड महापालिका उद्यान विभागाचे मुख्य व्यवस्थापक सुरेश साळुंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.