Breaking-newsक्रिडा
महाराष्ट्रकेसरी स्पर्धा २०२०: सागर मारकडची सुवर्णकामगिरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/maharashtra-kesari.jpg)
पुणे | महाईन्यूज
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शनिवारी पुणे जिल्ह्याच्या सागर मारकड याने माती विभागातील ६१ किलो वजनी गटात गतवर्षी सुवर्णपदक पटकाविलेल्या निखील कदमला चितपट करत सुवर्णपदक पटकावलं आहे. सागर मरकड याचे राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग पाचवे सुवर्णपदक ठरलेले आहे.
सागरने ५७ किलो गटात चार सुवर्णपदके पटकावली होती, ६१ किलो वजनी गटात त्याचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.अंतिम फेरीत पराभूत निखिल कदम याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. हनुमंत शिंदे,सोलापूर याने कांस्यपदक पटकावले आहे. हनुमंतने सौरभ राऊतचा पराभव केलेला आहे.