Breaking-news
यंदा परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/foreigners-in-india.jpg)
नवी दिल्ली : एप्रिल 2018 मध्ये 7 लाखपेक्षा जास्त परदेशी पर्यटकांचे देशात आगमन झाले. एप्रिल 2017च्या तुलनेत एप्रिल 2018 या महिन्यात पर्यटकांच्या संख्येत 4.4 टक्के वाढ झाली आहे. या अवधित बांग्लादेशमधून सर्वात जास्त 24.32 टक्के, तर त्या खालोखाल अमेरिकेमधून 11.21 टक्के पर्यटक भारतात आले.
दिल्ली विमानतळावर 28.75 टक्के, तर मुंबई विमानतळावर 14.46 टक्के प्रवाशांची नोंद झाली. जानेवारी ते एप्रिल 2018 या अवधित 918792 प्रवासी ई-टुरिस्ट व्हिसाच्या माध्यमातून भारतात दाखल झाले. जानेवारी ते एप्रिल 2017 या अवधित हे प्रमाण 581783 इतके होते.