भाजपच्या सत्तेत राष्ट्रवादीचा महत्वकांक्षी बालनगरी प्रकल्प रखडला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/2-11.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला बालनगरी प्रकल्पाचे काम ठप्प आहे. या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्या पुर्ण असून त्या कामासाठी सुमारे 22 कोटी रुपये खर्च केलेला आहे. तरीही गेल्या पाच वर्षापासून या प्रकल्पाचे काम अद्याप प्रलंबित आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत सत्तांतर झाले. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्या काळातील कामांकडे दुर्लक्ष झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकाळातील प्रकल्पांना आडकाठी घालण्याचा प्रयत्न होत आहे. महापालिकेच्या २०१७-२०१८ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाच्या तरतुदीसाठी पुरेसा निधी देण्यात आलेला नाही.
पिंपरी-चिंचवडला पर्यटननगरी करण्याचा संकल्प तत्कालीन महापौर मोहिनी लांडे यांनी केला होता. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पर्यटनवाढीच्या दृष्टीने शहरात विविध १२ प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित केले होते. त्यात बालनगरी या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार भोसरी औद्योगिक परिसरातील आरक्षण क्रमांक ४५ मध्ये १५ एकर जागेमध्ये बालनगरी उभारण्यात येत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/PNE19G15531_MED_GMPimpri3.jpg)
सुमारे ४८ कोटी रुपयांचा हा प्रकल्प दोन टप्प्यांत हा पूर्णत्वाला नेण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर पालिकेतील सत्तांतर आणि सत्ताधारी भाजपच्या आडमुठ् भूमिकेमुळे या प्रकल्पातील कामे रखडली आहेत.