Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
कर्जमाफीचे धोरण बदला, ठाकरे सरकारला राजू शेट्टींचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/19.jpg)
कोल्हापूर|महाईन्यूज|
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाख रुपये शेतक-यांना कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच कर्जमाफी निर्णयात लवकर बदल केले नाही तर प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी खासदार राजू शेटी यांना दिला. ते कोल्हापूरात पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी शेट्टी यांनी म्हटले की, सरकारला कर्जमाफीच्या धोरणात बदल करावा लागेल. अन्यथा त्यांना शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागेल. मुळात सरकारने व्यापक चर्चा करून कर्जमाफी जाहीर केली असती तर बरे झाले असते. मात्र, आता यानंतरही सरकार ऐकणार नसेल तर आम्हाला वेगळ्या भाषेत सांगावे लागेल, असा सूचक इशारा राजू शेट्टी यांनी दिला.