भोसरी विद्युत विभागाच्या विरोधात ‘बीआरएसपी’चे गुरूवारी आंदोलन
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भोसरीतील बालाजीनगर येथे विजेचा लपंडाव सुरू आहे. शहरात कोठेही वीज कपात लागू नसताना याठिकाणी मात्र दररोज दुपारी साडेबारा ते साडेपाच दरम्यान नित्यनियमाने वीज खंडीत केली जाते. वेळोवेळी निवेदन देऊनही एमएसईबीच्या अधिकारी याबाबत गंभीर नाहीत. यामुळे गुरूवारी (दि. 26) भोसरी एमएसईबी विभागाच्या समोर बहुजन रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
यासंदर्भात भोसरीतील विद्युत विभागाला बहुजन रिपब्लिकन पार्टीच्या वतीने कळविण्यात आले आहे. तरीही, यासंदर्भात अधिका-यांनी पाऊल उचलले नाही. परिणामी नागरिकांना वारंवार जाणा-या विद्युत प्रवाहामुळे त्रास सहन करावा लागत आहे. अधिकारी एवढे निर्ढावले आहेत की, तक्रारीची दखल घेतली जात नाही. शेवटी आंदोलनाचा पर्याय निवडावा लागत आहे. भोसरी विद्युत विभागाच्या विरोधात गुरूवारी बालाजीनगर येथील पावर हाऊसच्या समोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बीआरएसपीचे प्रभाग 8 चे अध्यक्ष महेंद्र सरवदे यांनी दिली आहे.