झारखंडमध्ये पराभव झालेल्या भाजपाच्या जखमेवर शरद पवारांनी चोळलं मीठ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/new-20.png)
झारखंड पॅटर्नमुळे देशातील भगवी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. शरद पवार यांनी ट्विट करत झारखंड विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबद्दल झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राजद आघाडीचं अभिनंदन केलं. आणि याचवेळी झारखंडमधील जनमताने भगवी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याच्या पॅटर्नला अधोरेखित केलं आहे. असं म्हणत झारखंडमध्ये पराभव झालेल्या भाजपाच्या जखमेवर मीठ टाकलं.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/1-6.png)
याआधी शरद पवार यांनी झारखंडच्या निकालावर भाष्य केलं होतं. “महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडनंतर आता झारखंडमधूनही भाजपा हद्दपार झाला आहे, भाजपाला लागलेली ही उतरती कळा आता कोणीही थांबवू शकणार नाही,” असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तविलं होतं. “सत्ता व संपत्तीचा वापर करून राज्ये ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न झारखंड विधानसभा निवडणुकीत अपयशी ठरला, जनतेने भाजपला स्वीकारलं नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसंच नागरिकतत्व सुधारणा कायद्याचा प्रभाव झारखंड निवडणुकांमध्ये दिसतोय अस ट्विट करत भाजपाचा खरपूस समाचार पवारांनी घेतला होता.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/2-9.png)
“झारखंडसह, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राज्यस्थान या पाच राज्यांतून भाजपा सरकारे हद्दपार झाली आहेत. झारखंडमध्ये आदिवासी व गरीब लोकांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील सत्ता व आर्थिक ताकदीचा वापर करूनही भाजपला तेथील जनतेने जुमानले नाही. या निकालामुळे अन्य राज्यांमध्येही भाजपच्या विरोधात एकत्रित सामना करायला एक विश्वास मिळाला आहे,” असंही शरद पवार यांनी म्हटलं होतं.